आपण इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना सर्व माहिती योग्य पद्धतीने दिली असली तरी कधी कधी इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस येऊ शकते. अशा नोटीस आल्यावर घाबरण्याऐवजी त्यामागची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
इन्कम टॅक्स नोटीस मिळण्याची प्रमुख कारणे
- ITR व फॉर्म 26AS/ AIS मध्ये तफावत
- आपल्या ITR मध्ये दाखवलेले उत्पन्न व टॅक्स विभागाच्या रेकॉर्डमध्ये (Form 26AS, AIS) नमूद केलेली माहिती जुळत नसेल तर नोटीस येऊ शकते.
- अजिबात किंवा वेळेत ITR न भरणे
- निर्धारित तारखेपूर्वी ITR न भरल्यास किंवा अजिबात रिटर्न न भरल्यास विभागाकडून नोटीस मिळू शकते.
- जास्त रिफंड क्लेम करणे
- जर आपला रिफंड क्लेम विभागाच्या गणनेशी जुळत नसेल तर तपासासाठी नोटीस येते.
- उत्पन्न लपविणे
- बँक खाते, FDs, भाडे उत्पन्न, शेअर मार्केट नफा यांसारखे उत्पन्न दाखवले नसल्यास नोटीस येऊ शकते.
- उच्च-मूल्याच्या व्यवहार
- मोठ्या रकमेची रोख रक्कम बँकेत जमा करणे, महागड्या मालमत्ता खरेदी करणे, क्रेडिट कार्डवर मोठ्या रकमेचा वापर इत्यादींमुळे टॅक्स विभाग चौकशी करू शकतो.
- TDS/TCS मध्ये फरक
- पगार, ठेवी, व्याज यावर कापलेला TDS व ITR मध्ये नमूद केलेली रक्कम वेगळी असल्यास नोटीस मिळते.
- पूर्वीच्या नोटीसला प्रतिसाद न देणे
- जर पूर्वी मिळालेल्या नोटीसला उत्तर दिले नसेल तर पुन्हा नोटीस येऊ शकते.
- रिफंड मिळवण्यासाठी खोटे डिडक्शन दाखवणे
- बऱ्याचदा जास्त रिफंड मिळवण्यासाठी खोटे डिडक्शन दाखवले जातात, परिणामी येथे नोटीस येण्याची शक्यता वाढते, या मध्ये २००% पेनल्टी देखील लागू शकते
इन्कम टॅक्स नोटीसचे प्रमुख प्रकार
- Section 139(9) – Defective Return Notice
- रिटर्नमध्ये तांत्रिक चूक किंवा अपूर्ण माहिती असल्यास पाठवली जाते.
- Section 142(1) – Inquiry Before Assessment
- टॅक्स विभाग आपली रिटर्न तपासण्यासाठी अतिरिक्त माहिती मागवतो.
- Section 143(1) – Intimation
- रिटर्न प्रक्रियेनंतर टॅक्स विभागाकडून गणना व फरकाची माहिती देण्यासाठी नोटीस येते.
- Section 143(2) – Scrutiny Notice
- टॅक्स विभाग आपला रिटर्न सखोल तपासणीसाठी निवडतो.
- Section 148 – Income Escaping Assessment
- काही उत्पन्न रिटर्नमध्ये दाखवले नसल्याचा संशय असल्यास नोटीस येते.
- Section 156 – Demand Notice
- टॅक्स, व्याज किंवा दंड भरण्याची मागणी करण्यासाठी पाठवली जाते.
- Section 245 – Adjustment of Refund
- जुनी थकबाकी व चालू रिफंड समायोजित करण्यासाठी नोटीस येते.
नोटीस आल्यावर काय करावे?
- नोटीसमधील सेक्शन व कारण नीट वाचा.
- निर्धारित वेळेत उत्तर द्या.
- आवश्यक कागदपत्रे सादर करा.
- आवश्यक असल्यास चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स सल्लागाराचा सल्ला घ्या.
- नोटीस दुर्लक्ष करू नका — यामुळे दंड किंवा कारवाई होऊ शकते.
निष्कर्ष
इन्कम टॅक्स नोटीस येणे म्हणजे नेहमीच गैरप्रकार झालेला असतो असे नाही. अनेकदा ती फक्त माहिती पडताळणीसाठी असते. योग्य वेळेत व योग्य पद्धतीने प्रतिसाद दिल्यास ही प्रक्रिया सोपी व त्रासमुक्त होऊ शकते.
लेखकाविषयी (About the Author)
नमस्कार! मी ADV. SHANTANU PEDNEKAR कर सल्लागार (Tax Consultant) आणि Tax Way Solutions चा संस्थापक.
कर क्षेत्रात काम करण्याचा माझा प्रवास एका साध्या ध्येयाने सुरू झाला — लोकांना कराची भीती न वाटता, नियम समजून घेऊन योग्य पद्धतीने टॅक्स व्यवस्थापन करता यावे.
गेल्या 8-10 वर्षांत, मी शेकडो व्यक्ती आणि व्यवसायांना ITR फाइलिंग, GST, TDS, आणि व्यवसाय नोंदणीमध्ये मदत केली आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी कर क्षेत्रात स्वतःचा यशस्वी करिअर सुरू केला आहे.
मी विश्वास ठेवतो की “योग्य ज्ञान हेच सर्वोत्तम गुंतवणूक आहे” — आणि म्हणूनच मी माझे अनुभव व ज्ञान ब्लॉग, सेमिनार, आणि ऑनलाईन कोर्सेसद्वारे सर्वांसोबत शेअर करतो.
जर तुम्हाला करसंबंधी मदत हवी असेल, तर निःसंकोच संपर्क करा.
📞 संपर्क: 8767354079
📧 ईमेल: taxwaysolutions12@gmail.com
🌐 वेबसाईट: www.taxwaysolutions.in
अचूक ITR फॉर्म निवडण्यासाठी येथे क्लिक करा: https://speduskills.com/select-right-itr-forms/