ADVANCE TAX (अड्वान्स टॅक्स)

Advance Tax (अड्वान्स टॅक्स) म्हणजे आर्थिक वर्ष चालू असताना त्या वर्षीच्या मिळवलेल्या किंवा ३१ मार्च पर्यंत मिळणाऱ्या अंदाजे इन्कम वर भरावा लागणारा INCOME TAX होय. म्हणजेच आता जे आर्थिक वर्ष (Financial Year) चालू आहे त्या वर्षाच्या ३१ मार्च पर्यंत जो काही इन्कम टॅक्स भरला जाईल तो ADVANCE TAX असेल. मग असा ADVANCE TAX किती भरावा याची कायद्यामध्ये तरतूद आहे.

ADVANCE TAX (अड्वान्स टॅक्स) भरण्याची जबाबदारी

Income Tax च्या कलम 208 नुसार, प्रत्येक व्यक्ती ज्याचे वर्षासाठी अंदाजे Income Tax, Rs. 10,000 किंवा त्याहून अधिक असल्यास , ADVANCE TAX च्या स्वरूपात, Income Tax भरावा लागतो.

ADVANCE TAX भरण्यास जबाबदार नसलेली व्यक्ती

वर चर्चा केल्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्ती ज्याचे वर्षासाठी अंदाजे कर दायित्व रु. 10,000 किंवा अधिक असल्यास ADVANCE TAX भरण्यास जबाबदार असेल.  

यातून  , निवासी ज्येष्ठ नागरिक (म्हणजे, ६० वर्षे वयाची व्यक्ती किंवा त्या वरील) व्यक्तीचे व्यवसायातून काही मिळकत नसल्यास ADVANCE TAX  तरतुदीमधून वगळण्यात आले आहे म्हणजेच ADVANCE TAX भरण्याची गरज नाही, मात्र जर व्यवसायातून मिळकत असल्यास अशा व्यक्तींना देखील ADVANCE TAX भरावा लागतो.

ADVANCE TAX कसा काढावा?

Advance Tax किती भरावा हे बघण्यासाठी सर्वप्रथम त्या वर्षीचे अंदाजे इन्कम मोजावे आणि Income Tax मध्ये दिलेल्या टक्केवारीनुसार Tax काढावा. Tax Calculation साठी येथे क्लीक करा.

आता काढलेला Tax,  Advance Tax मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार खालील Installment नुसार भरावा लागेल

15 जून पर्यंत : Advance Tax  च्या 15 %

15 सप्टेंबर  पर्यंत : Advance Tax  च्या 45 %

15 डिसेंबर  पर्यंत : Advance Tax  च्या 75 %

15 मार्च पर्यंत : Advance Tax  च्या 100 %

जर आपण 44AD किंवा 44ADA मध्ये रिटर्न भरत असल्यास , 15 मार्च पर्यंत : Advance Tax  च्या 100 %  भरावे लागेल. (म्हणजे पहिल्या ३ इंस्टॉलमेंट न भरता सरळ 100% Tax 15 मार्च पर्यंत भरला जाऊ शकतो)

उदा. समजा तुम्हाला Rs. 31,400 ADVANCE TAX भरायला येतोय, तो खालील प्रमाणे भरावा लागेल

ADVANCE TAX वेळेत न भरल्यास काय होईल? (LATE FEE)

Advance Tax वेळेत न भरल्यास Section 234B आणि 234BC नुसार इंटरेस्ट लागू शकतो.

Section 234B: Section 234B नुसार, तुम्ही एकूण करांपैकी किमान 90% आगाऊ कर म्हणून 31 मार्चपर्यंत भरणे आवश्यक आहे. ADVANCE TAX भरण्यात अयशस्वी झाल्यास न भरलेल्या रकमेवर @ 1% इंटरेस्ट लागेल.

Section 234C: ADVANCE TAX भरण्यास उशीर झाल्यास 234C नुसार लेट झालेल्या प्रत्येक महिन्याला 1% इंटरेस्ट लागेल.

ADVANCE TAX ऑनलाइन कसा भरायचा?

  1. सर्वप्रथम इन्कम टॅक्स पोर्टल ला जावे लागेल.
  2. त्यानंतर डाव्या साइड ला E-PAY TAX ऑप्शन वर क्लिक करा.
ADVANCE TAX

3. PAN नंबर आणि मोबाइल नंबर टाकून CONTINUE करा.

4. मोबाइल वर आलेला OTP टाकून CONTINUE करा.

5. ‘इन्कम टॅक्स’ ऑप्शन निवडा आणि ‘प्रोसीड’ वर क्लिक करा.

6. ASSESMENT YEAR सिलेक्ट करा आणि ADVANCE TAX (100) क्लिक करून प्रोसिड करा.

7. त्यानंतर ADVANCE TAX ची AMOUNT टाकून पेमेंट चा ऑप्शन निवडा आणि चलन भरून घ्या.

8. पेमेंट पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला पुढील स्क्रीनवर एक चलन पावती मिळेल. तुम्ही चलानच्या उजव्या बाजूला BSR CODE आणि CHALLAN SERIAL NUMBER पाहू शकता.

भविष्यातील संदर्भासाठी या कर पावतीची एक प्रत जतन करा. तुम्हाला तुमच्या टॅक्स रिटर्नमध्ये BSR कोड आणि CHALLAN NUMBER टाकावा लागेल.

Challan चुकीचे भरले गेल्यास इन्कम टॅक्स लॉगिन करून दुरुस्त करता येते.

ASSESSMENT YEAR बदल पेमेंट केल्याच्या 7 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे आणि MAJOR HEAD आणि MINOR HEAD मध्ये बदल पेमेंट केल्याच्या 30 दिवसांच्या आत केले जाऊ शकतात.

2 thoughts on “ADVANCE TAX (अड्वान्स टॅक्स)”

Leave a Comment