FSSAI मधील हे बदल वेळीच माहिती करून घ्या.

Food Safety and Standard (FSSAI) कायद्यामध्ये वारंवार बदल होत असून अन्न व्यावसायिकांना त्याची कल्पना नसते त्यामुळे Food Safety Officer अनेकदा कायदेशीर कार्यवाही करताना व दंड आकारताना दिसून येते. या लेखा मध्ये आपण काही महत्वाचे बदल जाणून घेणार आहोत तसेच दरवर्षी कराव्या  लागणाऱ्या कामांचा देखील आढावा घेणार आहोत.   

  • यायापुढे Food License फक्त एक वर्षासाठीच रजिस्टर तसेच नुतनीकरण केले  जाईल. म्हणजेच दरवषी परवाना विहित कालावधीत नुतानिकरण  करून घ्यावा लागेल.
  • अन्न सुरक्षा कायद्यापखाली १२ लाखांपेक्षा कमी टर्नओवर असलेल्या छोट्या अन्न व्यावसायिकास मात्र नोंदणी कालावधी जास्तीत जास्त  पाच वर्षाचा असेल.
  • Food License ची  मुदत संपण्याच्या आधी 180 दिवसांपूर्वी नूतनीकरण करून घेणे  अनिवार्य आहे.
  •  अन्न उत्पादक. दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, डेअरी यांना वर्षातून एकदा 31 मे पर्यंत D-1 रिटर्न (परतावा) ऑनलाइन Foscos या साइट  वर अपलोड करावा लागेल.एक जूनच्यानंतर दरदिवशी ₹100 दंडाची आकारणी रिटर्न भरेपर्यंत होईल.या पूर्वी ही आकारणी जोपर्यंत रिटर्न भरले जात नाही तोपर्यंत केली जात होती.तथापि त्या सुधारणा करण्यात आलेली असून 2022. 2023 च्या पुढील रिटर्न साठी. फूड लायसन्स च्या  एक वर्षाच्या फी च्या  पाच पट पेक्षा जास्त आकारणी करता  येणार नाही.
  • अन्न उत्पादक. दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, डेअरी यांना वर्षातून दोन वेळा (सहामाही) अन्नपदार्थ, जीवाणू विषाणू परीक्षण करून त्याचा होम प्रयोगशाळा त्यातील वापरण्यात येणारी रसायने किंवा NABL/FSSAI मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा अहवाल ऑनलाइन Foscos साइट वर अपलोड करावा लागेल.

रिटर्न भरण्याचा कालावधी?

एप्रिल ते सप्टेंबरचे रिटर्न 31 ऑक्टोबर पर्यंत तर ऑक्टोबर ते मार्च या कालावधी रिटर्न 30 एप्रिल पर्यंत सादर करता येतील.

रिटर्न सादर करण्याचा कालावधी नवीन परवाना घेणाऱ्या  अन्य व्यावसायिकास त्या  कालावधीसाठी रिटर्न भरण्यापासून सवलत मिळेल.

Leave a Comment