FY 2023-24 (AY 2024-25) साठी कोणता ITR Form फाईल करावा?

ITR फाईल करताना अचूक फॉर्म भरणे खूप गरजेचे आहे.  तर या ब्लॉग मध्ये जाणून घेऊ, FY 2023-24 (AY 2024-25) साठी कोणता ITR Form फाईल करावा.

ITR-1 किंवा SAHAJ FORM

हा ITR फॉर्म अशा Residential Individuals साठी आहे ज्यांच्या AY 2024-25 च्या एकूण उत्पन्नामध्ये (Total Income) खालील इन्कम समाविष्ट आहे:

  1. Salary/Pension चे इन्कम; किंवा
  2. एका घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न किंवा
  3. Other Income / इतर स्त्रोतांकडून मिळकत (Lottery आणि Horse Racing चे इन्कम वगळता)
  4. 5000 रुपयांपर्यंत चे  Agriculture Income (शेती चे इन्कम).
  1. Total Income / एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास.
  2. 5000 रुपयांपेक्षा जास्त Agriculture /कृषी इन्कम असल्यास
  3. Capital Gain असल्यास
  4. business किंवा profession इन्कम असेल
  5. एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून इन्कम असेल
  6. तुम्ही कंपनीत Director असाल तर
  7. कोणतेही Foreign Income असल्यास
  8. जर तुमच्याकडे काही मागील वर्षीचा Loss असल्यास किंवा चालू वर्षीचा Loss पुढे Carry Forward करायचे असल्यास.

ITR 2

ITR-2 हे Individual किंवा HUF साठी आहे ज्यांच्या AY 2024-25 च्या Total Income / एकूण उत्पन्नामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:

  1. Salary/Pension चे इन्कम; किंवा
  2. घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न
  3. Other Income / इतर स्त्रोतांकडून मिळकत (Lottery आणि Horse Racing चे इन्कम वगळता)
  4. तुम्ही कंपनीत Director असाल तर
  5. 5000 रुपयांपेक्षा जास्त Agriculture /कृषी इन्कम असल्यास
  6. Capital Gain असल्यास
  7. कोणतेही Foreign Income असल्यास
  8. जर तुमच्याकडे काही मागील वर्षीचा Loss असल्यास किंवा चालू वर्षीचा Loss पुढे Carry Forward करायचे असल्यास. Etc.

नोट- या मध्ये एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असू शकते.

जर आपले Business किंवा Profession पासून चे इन्कम असल्यास ITR-2 फॉर्म लागू नाही होणार या साठी ITR-3 किंवा ITR-4 भरला जातो.

ITR-3

ITR-3 हा फॉर्म Business किंवा Profession पासून इन्कम असल्यास Individual किंवा HUF द्वारे फाईल केला जातो.

खालील स्त्रोतांकडून उत्पन्न असलेल्या व्यक्ती ITR-3 दाखल करण्यास पात्र आहेत:

  1. कंपनी मध्ये Director असल्यास
  2. Unlisted Equity Shares मध्ये गुंतवणूक केली असल्यास
  3. Intra Day, Future & Options या मधून इन्कम असल्यास

नोट- या मध्ये बीजनेस आणि प्रोफेशन इन्कम सोबत House property, Salary/Pension आणि इतर इन्कम असू शकते.

ITR-4 Or Sugam Form

सध्याचा ITR-4 हा Individual आणि HUF,  Partnership Firm (LLP व्यतिरिक्त) यांना लागू होतो, जे Resident आहेत आणि ज्यांच्या Total Income मध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहे.

  1. Section 44AD किंवा 44AE Scheme मध्ये बिजनेस इन्कम दाखवत असल्यास
  2. Section 44ADA मध्ये प्रोफेशन इन्कम दाखवत असल्यास
  3. Salary किंवा Pension पासून 50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असल्यास
  4. एका घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, रु. ५० लाखांपेक्षा जास्त नसल्यास (मागील वर्षीचे Loss असल्यास ते वगळून)
  5. Other Income 50 लाखांपेक्षा जास्त नसल्यास (लॉटरी आणि घोड्यांच्या शर्यतीतील उत्पन्न वगळून)

कृपया लक्षात घ्या की Freelancer (फ्रीलांसर) म्हणून वरील-उल्लेखित स्त्रोतांमधून उत्पन्न मिळवणारी कोणतीही व्यक्ती त्यांचे एकूण इन्कम रु. 50 लाखांपेक्षा जास्त नसल्यास वरील स्कीम ची निवड करू शकतात.

  1. तुमचे एकूण उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असल्यास
  2. एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून उत्पन्न असणे
  3. कोणत्याही विदेशी मालमत्तेचे मालक असणे
  4. तुमच्याकडे भारताबाहेरील कोणत्याही खात्यात स्वाक्षरी करण्याचा अधिकार असल्यास
  5. भारताबाहेरील कोणत्याही स्रोतातून उत्पन्न असणे
  6. तुम्ही कंपनीत Director असाल तर
  7. तुम्ही आर्थिक वर्षात कधीही Unlisted Equity Shares मध्ये गुंतवणूक केली असल्यास
  8. Resident नसणे म्हणजेच RNOR आणि Non Resident असल्यास
  9. Foreign Income असल्यास
  10. Capital Gain Income असल्यास

ITR-5

ITR-5 हा फॉर्म Partnership Firm, LLP (Limited Liability Partnership), AOP (Association of Persons) BOI  (Body of Individuals), Artificial Juridical Person(AJP, बिझनेस ट्रस्ट आणि गुंतवणूक निधीसाठी फाईल केला जातो.

ITR-6

Section 11 (धर्मादाय किंवा धार्मिक हेतूंसाठी ठेवलेल्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न) अंतर्गत सूट मिळण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांसाठी, हे रिटर्न केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावे लागेल.

ITR-7

कलम 139(4A) किंवा कलम 139(4B) किंवा कलम 139(4C) किंवा कलम 139(4D) किंवा कलम 139(4E) किंवा कलम 139(4F) अंतर्गत रिटर्न भरणे आवश्यक असलेल्या कंपन्यांसह व्यक्तींसाठी.

कलम 139(4A) अंतर्गत रिटर्न प्रत्येक व्यक्तीने ट्रस्ट किंवा इतर कायदेशीर बंधनांतर्गत असलेल्या मालमत्तेतून मिळवलेल्या उत्पन्नाच्या पावतीवर भरणे आवश्यक आहे पूर्णपणे धर्मादाय किंवा धार्मिक हेतूंसाठी किंवा अंशतः अशा हेतूंसाठी.

कलम 139(4B) अंतर्गत रिटर्न कलम 139A च्या तरतुदींना लागू न करता एकूण उत्पन्न कमाल रकमेपेक्षा जास्त असल्यास, आयकर आकारणीयोग्य नसेल तर राजकीय पक्षाने भरणे आवश्यक आहे.

कलम 139(4C) अंतर्गत प्रत्येकाने रिटर्न भरणे आवश्यक आहे –

वैज्ञानिक संशोधन संघटना;

वृत्तसंस्था;

कलम 10(23A) मध्ये संदर्भित संघटना किंवा संस्था;

कलम 10(23B) मध्ये संदर्भित संस्था;

निधी किंवा संस्था किंवा विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था किंवा कोणतेही रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय संस्था.

कलम 139(4D) अंतर्गत रिटर्न प्रत्येक विद्यापीठ, महाविद्यालय किंवा इतर संस्थेने भरणे आवश्यक आहे, ज्याला या कलमाच्या इतर कोणत्याही तरतुदीनुसार उत्पन्न किंवा तोट्याचा परतावा देणे आवश्यक नाही.

कलम 139(4E) अंतर्गत रिटर्न प्रत्येक व्यावसायिक ट्रस्टने दाखल करणे आवश्यक आहे ज्याला या विभागाच्या इतर कोणत्याही तरतुदींनुसार उत्पन्न किंवा तोट्याचा परतावा देणे आवश्यक नाही.

कलम 139(4F) अंतर्गत परतावा कलम 115UB मध्ये संदर्भित कोणत्याही गुंतवणूक निधीद्वारे भरला जाणे आवश्यक आहे. या कलमाच्या इतर कोणत्याही तरतुदींनुसार उत्पन्न किंवा तोट्याचा परतावा देणे आवश्यक नाही.

6 thoughts on “FY 2023-24 (AY 2024-25) साठी कोणता ITR Form फाईल करावा?”

Leave a Comment