HUF बनवून TAX कशा प्रकारे वाचवू शकता?

HUF म्हणजे काय?

HUF म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब (Hindu undivided family). हिंदूं, बौद्ध, जैन तसेच  शीख धर्मीय देखील HUF बनवू शकतात. HUF चे स्वतःचे PAN असते आणि सदस्यांसारखे HUF चा देखील वेगळा आयकर रिटर्न भरता येतो. तस बघायला गेल तर प्रत्येकाच्या घरात हिंदू कायद्यानुसार HUF बनलेली असते आणि घरात जन्मणारा प्रत्येक व्यक्ती हि त्या HUF ची जन्मजात सभासद बनते, पण कायद्यानुसार TAX मध्ये सहभागी करण्यासाठी HUF चे वेगळे PAN कार्ड काढणे गरजेचे असते

HUF तयार करून TAX कसा वाचवायचा?

आता तुम्हाला वाटेल कि HUF बनवून TAX कसा वाचवता येईल. तर जसे व्यक्ती ला आयकर लागतो त्याच प्रमाणे HUF ला देखील त्याच दराने आयकर लागतो. तसेच HUF  ला कर वाचवण्यासाठी मिळणारे वजावट देखील भेटते जसे कि कलम 80 C किंवा 80 D वगेरे. पण सभासद आणि HUF दोघेही एकच वजावट वापरू शकत नाही. जसे समजा सभासदांसाठी घेतलेल्या इन्शुरन्स ची वजावट जर HUF कर भरताना दाखवत असेल तर ती वजावट   सभासदांना त्यांचा वैयक्तिक रिटर्न भरताना वापरता येणार नाही.

HUF बनवून सभासद अधिक चे उत्पन्न HUF च्या नावाने दाखवून स्वतःवरील इन्कम चा भार कमी करून आपला अधिक चा कर वाचवू शकतात.

HUF साठी कर कशाप्रकारे आकारला जातो?

HUF साठी कर कशाप्रकारे आकारला जातो?

HUF चे स्वतःचे PAN असते आणि त्याचा स्वतंत्र आयकर रिटर्न फाइल करते.

आयकर रिटर्नमध्ये, कलम 80 अंतर्गत वजावट आणि इतर सवलतींचा दावा HUF करू शकते.

HUF आपल्या सदस्यांच्या जीवनावर विमा पॉलिसी घेऊ शकते.

HUF आपल्या सदस्यांना पगार देऊ शकते जर त्यांनी HUF च्या कामकाजात हातभार लावला. हा पगाराचा खर्च HUF च्या उत्पन्नातून वजा केला जाऊ शकतो.

हे आपल्याला खालील उदाहरणावरून सजता येईल.

INCOMEMR. ASHOK INCOME (BEFORE HUF FORMATION)MR. ASHOK INCOME( AFTER HUF FORMATION)HUF INCOME
SALAR10,00,000/-10,00,000/- 
BUSINESS5,00,000/- 5,00,000/-
HOUSE RENT (AFTER DEDUCTION)3,00,000/- 3,00,000/-
TAXABLE INCOME18,00,000/-10,00,000/-8,00,000/-
TAX PAYABLE3,66,600/-1,17,000/-75,400/-

Tax Computation

वरील उदाहरणावरून असे समजते कि श्री अशोक यांना HUF बनवायच्या अगोदर ३,६६,६००/- इतका TAX भरावा लागला असता, पण HUF बनवून बिजनेस आणि भाडे स्वरूपातील इन्कम HUF च्या नावे दाखवून ११७००० +७५४०० एकूण १९२४०० इतकाच TAX भरावा लागेल म्हणजेच एकूण  १७३६०० इतक्या  TAX ची  बचत होईल.

HUF कसे तयार करावे?

एक व्यक्ती HUF बनवू शकत नाही, ती केवळ कुटुंबाद्वारे तयार केली जाऊ शकते.

लग्नाच्या वेळी एक HUF आपोआप तयार होतो.

HUF मध्ये एक सामान्य पूर्वज आणि त्यांचे सर्व वंशज, त्यांच्या पत्नी आणि अविवाहित मुलींचा समावेश आहे.

हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख HUF बनवू शकतात.

HUF कडे सहसा अशी मालमत्ता असते जी भेटवस्तू, इच्छापत्र किंवा वडिलोपार्जित मालमत्ता किंवा त्यांच्याकडून मिळवलेली मालमत्ता असते.

HUF साठी लीगल डीड बनवावी लागते जे कि PAN कार्ड काढण्यासाठी अत्यावश्यक आहे.

HUF बनवण्यासाठी किमान किती सदस्यांची गरज असते?

एक HUF किमान  दोन सदस्यांसह तयार केले जाऊ शकते ज्यापैकी एक सह-सदस्य आहे. परंतु एखाद्या घटकाला HUF म्हणून कर आकारला जाण्यासाठी, त्याच्याकडे किमान दोन coparcener असणे आवश्यक आहे.

HUF आणि HUF चे सदस्य स्वतंत्रपणे कलम 80C अंतर्गत कपातीचा दावा करू शकतात का?

हो, कलम 80C अंतर्गत कपातीचा दावा करू शकतात . पण , सदस्य आणि HUF दोघेही एकाच वजावटीचा दावा  करू शकत नाही.

कर्त्याच्या निधनानंतर ‘कर्ता’ ही पदवी कोण घेते?

कर्ताच्या निधनानंतर, कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्य कुटुंबाचा कर्ता बनतो. मृत कर्ताची पत्नी जिवंत असतानाही, मोठा मुलगा किंवा कुटुंबातील इतर कोणताही ज्येष्ठ पुरुष सदस्य हे पद स्वीकारेल

2 thoughts on “HUF बनवून TAX कशा प्रकारे वाचवू शकता?”

  1. Huf मध्ये 1 सामन्य purvaj लागतो म्हणजे नक्की कोण? ज्यांच्याकडे आजी, आजोबा असे कोणी नसेल तर काय?

    Reply

Leave a Comment